Bhumi Abhilekh Bharti 2022

भूमी अभिलेख फायनल मेरिट लिस्ट,निवड यादी अपडेट | Bhumi Abhilekh Bharti Updates 



राज्याच्या भूमी अभिलेख जमिनीची मोजणी विभागांतर्गत करणाऱ्या भूकरमापकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील महिन्यापासून १२५० भूकरमापक विभागात सेवा बजावणार आहेत. भूमी अभिलेख विभागांतर्गत विविध पदांवरील कर्मचाऱ्यांमार्फत फेरफार उतारा, जमिनीच्या नोंदी आणि जमिनीची मोजणीचे काम करण्यात येते. जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. (Bhumi Abhilekh Result)

भूमिअभिलेख विभागात एकूण चार हजार पदे कार्यरत आहेत. पैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत. त्यातील १२५० पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर निकालही जाहीर करण्यात आला. (Bhumi Abhilekh Result)

उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या वर्गवारीनुसार कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची २१ एप्रिलनंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. यादीनुसार उमेदवारांना एक मे रोजी भूमी अभिलेख सेवेत दाखल करण्याचे नियुक्तीपत्र दिले जाईल,’ असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी स्पष्ट केले.

उमेदवारांची सुधारित यादी प्रसिद्ध करण्याबाबत (Bhumi Abhilekh Result)

उपसंचालक भूमि अभिलेख नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोकण (मुंबई) यांच्या अधीनस्त विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ कालावधीत IBPS कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेस (Computer Based Test) उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल (सर्वसाधारण गुणवत्ता यादी ) व विभागातील प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार पदभरतीकामी उपलब्ध जागांचा तपशील दिनांक २१/०१/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

ऑनलाईन परिक्षेचा निकाल (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) व समांतर आरक्षणानुसार प्रवर्गनिहाय उपलब्ध जागा विचारात घेवून दि. १५/०२/२०२३ रोजी कागदपत्रे पडताळणी / तपासणी कामी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. परंतु सदर यादीबाबत काही आक्षेप प्राप्त झाल्यामुळे सदर यादी मागे घेण्यात येवून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे विभागाकडे प्राप्त झालेली उमेदवारांच्या माहितीची तपासणी करण्यात आलेली आहे. ऑनलाईन परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करण्यास परवानगी देता येणार नाही. तथापि महिला उमेदवारांचे बाबतीत ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी लिंग (Gender) या रकान्यात भरलेली माहिती महिला आरक्षणाकरीता ग्राह्य धरण्याबाबत विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यानुसार विभागात पदभरती कामी उपलब्ध जागा व ऑनलाईन परिक्षेच्या निकालानुसार प्रसिद्ध करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पदभरती प्रक्रियेकामी कागदपत्रे पडताळणी / तपासणी कामी उमेदवारांची सुधारीत यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादीमध्ये समाविष्ट उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी / तपासणी कामी नमुद ठिकाणी वेळापत्रकानुसार उपस्थित रहाण्याचे आहे.

सोबतच्या यादीमध्ये नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमुद आरक्षणानुसार केवळ कागदपत्रे तपासणीकामी बोलविण्यात आलेले आहे. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी / तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदांनुसार अंतिम निवडसुची प्रसिद्ध करण्यात येईल. व उर्वरित पात्र उमेदवारांचा समावेश प्रतिक्षासूचीत करण्यात येईल. याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संबंधीत विभागीय उपसंचालक भूमि अभिलेख यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक निवड समिती यांना राहतील.

सरळसेवा भरती 2022, कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांची विभागनिहाय यादी.

औरंगाबाद विभाग

अमरावती विभाग

नागपूर विभाग

कोकण (मुंबई) विभाग 

नाशिक विभाग

पुणे विभाग



1 Comments

Previous Post Next Post