Air India अंतर्गत कंपनीत 10 वी, ते पदवीधरांना नोकरी

कोणतीही परिक्षा नाही थेट मुलाखतीव्दारे निवड ,480 रिक्त जागांसाठी भरती

सध्या अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. सध्या एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL Recruitment) अंतर्गत 480 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.  

या पदभरती अंतर्गत “व्यवस्थापक-रॅम्प/देखभाल, उप. व्यवस्थापक रॅम्प/देखभाल, वरिष्ठ पर्यवेक्षक – रॅम्प/देखभाल, ज्युनियर पर्यवेक्षक, वरिष्ठ रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, टर्मिनल मॅनेजर, उप. टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, टर्मिनल मॅनेजर – कार्गो, Dy. टर्मिनल मॅनेजर-कार्गो, ड्युटी मॅनेजर – कार्गो, ड्यूटी ऑफिसर – कार्गो, ज्युनियर ऑफिसर – कार्गो, सीनियर ग्राहक सेवा कार्यकारी, ग्राहक सेवा कार्यकारी, ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, पॅरा मेडिकल कम ग्राहक सेवा कार्यकारी” अशी विविध पदे भरली जाणार आहेत.

ही भरती पदांच्या 480 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 ते 30 मे 2023 (पदांनुसार) आहे.

रिक्त जागांची निवड थेट मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी – GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी- पूर्व, मुंबई- 400099 या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहयचे आहे.

AIATSL Recruitment PDF ADVT – https://workmore.in/AIATSL/Recruitment.pdf

अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in

Post a Comment

Previous Post Next Post