Digital 7/12
आता सातबारा उतारा हवा असेल तर आता तुम्हाला तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण आता राज्यातील २३ बँकाबरोबर भूमी अभिलेख विभागाने करार केला आहे. या बँकांना डिजिटल सही असलेला ऑनलाईन सातबारा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला कर्जासाठी किंवा बँकेच्या इतर कारणासाठी सातबारा जोडण्याची गरज नाही. महसुल विभागाने राज्यातील सर्व जमीनीचे सातबारा संगणकीकृत करून दिले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील २ कोटी ५३ लाख सातबारांपैकी २ कोटी ५० लाख ६० हजार सातबारा डिजिटल स्वाक्षरीत केले आहेत. त्यामुळे त्यांची प्रत ऑनलाईन उपलब्ध होत आहे. जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने डिजिटल सातबारा बॅंकिंग पोर्टल उघडले आहे. या पोर्टलची सेवा मिळण्यासाठी २३ बँकांनी करार केले आहेत अशी माहिती राज्याचे ई-फेरफार समन्वयक रामदास जगताप यांनी दिली आहे. त्यामुळे आता अनेक जणांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असते. या करारामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, एच.डी.एफ.सी.बॅंक, आय.सी.आय.ई.आय. बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक इ. बँकांचा समावेश आहे.
डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस:
खालील महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट लिंक ओपन करा.
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
या वेबसाईटवर पहिल्यांदा नवीन वापरकर्ता खालील प्रमाणे “Regular Login” या पर्याय निवडून नोंदणी करा किंवा “OTP” लॉगिनचा पर्याय निवडा.
एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला खालील माहिती भरायची आहे.
- वैयक्तिक माहिती – Personal Information
- पत्ता माहिती – Address Information
- लॉगइन माहिती – Login Information
यानंतर तुमच्या समोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल. त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे.
डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खालील माहिती भरायची आहे.
- जिल्हा (District):
- तालुका (Taluka):
- गाव (Village):
- सर्वे नंबर/गट नंबर शोधा (Search Survey No./Gat No.):
- सर्वे नंबर/गट नंबर निवडा (Select Survey No./Gat No.):
टीपः प्रत्येक सातबारा डाऊनलोड करण्यासाठी 15 रुपये आकारले जातील. उपलब्ध रकमेमधून ही रक्कम कपात केली जाईल.
आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथे काही बॅलन्स नसते. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणे गरजेचे असते. वरील माहिती भरल्यानंतर “Recharge Account” वर क्लिक करा.
आकारलेली रक्कम डाउनलोड दस्तऐवजांसाठी वापरली जाऊ शकते आणि परताव्यासाठी त्याचा दावा केला जाऊ शकत नाही. बँक शुल्क (प्रक्रिया शुल्क, जीएसटी इ.) नुसार अतिरिक्त शुल्क लागू केले जाऊ शकते.
15 ते 1000 दरम्यान रक्कम रिचार्ज करून अकाउंट मध्ये जमा करू शकता.
त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम अँप असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.
पेमेंट झाल्यानंतर पुढे चालू ठेवण्यासाठी “Continue” बटन वर क्लिक करा आणि पुढे तुम्हला सातबारा डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन दिसेल त्यावर क्लिक करून PDF फाईलमध्ये डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.
जर उपलब्ध रकमेची रक्कम (15 रुपये) वजा केली जाते आणि जर सातबारा डाऊनलोड होऊ शकला नसेल तर पेमेंट हिस्ट्री ऑप्शनवर जा आणि सातबारा डाउनलोड करा, हे डाउनलोड फक्त 72 तासांसाठी उपलब्ध असेल.
या सातबाऱ्यावर हा सातबारा कोणत्या तारखेला डिजिटल स्वाक्षरीसह तयार झाला आहे, याची माहिती सातबाऱ्याच्या खालच्या बाजूला दिली असेल. हा सातबारा डिजिटल स्वाक्षरीने तयार केला असल्यामुळे या सातबाऱ्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज लागणार नाही. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हा सातबारा तुम्ही अधिकृतरित्या वापरू शकतो. अशा प्रकारे तुम्ही काही मिनिटातच डिजिटल स्वाक्षरीचा साताबारा घर बसल्या काढू शकता.
अशा प्रकारच्या महत्वाच्या माहितीसाठी what's up ग्रुप खालील लिंक वापरून join करा