MPSC लिपिक-टंकलेखक मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी उमेदवारांची यादी प्रसिध्द

 MPSC Group C Selection And Merit List 2022

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२, मधील लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. (MPSC Group C Selection And Merit List)

LIST OF CANDIDATES QUALIFIED FOR TYPING TEST – MARATHI

LIST OF CANDIDATES QUALIFIED FOR TYPING TEST – ENGLISH

सदर अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी अंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.


खेळाडूसाठी आरक्षित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला असून त्यांचा अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.


दिव्यांग, माजी सैनिक तसेच अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.


प्रस्तुत अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी मा. न्यायालय / मा. न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.


टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post