HCL’ देणार 15,000 जणांना नोकरी

फ्रेशर्स उमेदवारांसाठी मोठी खूशखबर | HCL Recruitment

आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. या क्षेत्रात प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेक कंपनीने (HCL Recruitment) यंदा 2023 मध्ये अनेक फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2024 मध्ये लॅटरल हायरिंगवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी कंपनी 15 हजार फ्रेशर्सची भरती (HCL Recruitment) करणार आहे. कंपनीने नुकताच हा आकडा जाहीर केला. यामुळे कॅम्पसद्वारे नोकरभरतीला चालना देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. ‘कंटेंट डॉट टेकगिग’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

लॅटरल हायरिंग कमी करण्यासाठी एचसीएलने (HCL Recruitment) यंदाही फ्रेशर्सची मोठ्या प्रमाणात भरती केली. कंपनी आता पुढच्या वर्षीही फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणात संधी देणार आहे. फ्रेशर्सना प्रशिक्षण देऊन विविध प्रोजेक्ट्समध्ये त्यांना सामावून घेण्याचा कंपनीचा उद्देश आहे. सध्याची मनुष्यबळाची गरज पाहता फ्रेशर्सना कंपनीत स्थान देता येऊ शकतं, असे आमच्या पुरवठा विभागाची आकडेवारी सांगते, असं एचसीएल टेकचे सीईओ विजयकुमार यांचे म्हणणे आहे.

एचसीएल (HCL Recruitment) कंपनीने यंदा 27 हजार फ्रेशर्सना नोकरी दिली असून यापैकी काही उमेदवारांचे प्रशिक्षण अजूनही सुरू आहे. पुढच्या वर्षीच्या नोकरभरतीचा आकडा जाहीर करणारी HCL पहिलीच कंपनी आहे. विजयकुमार यांच्या मते, उत्पादन आणि उच्च तंत्रज्ञानामधले काही प्रोजेक्ट्स सध्या रखडले आहेत. टेक्नॉलॉजीवर खर्च करण्यासाठीचे बजेट क्लाएंट्सनी कमी केले आहे, हे त्यामागचे कारण आहे.

आर्थिक वर्ष 2022-23च्या चौथ्या तिमाहीसाठी कंपनी त्यांच्या 85 टक्के कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे देणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. आधीच्या तिमाहीप्रमाणेच कंपनीने नफा मिळाल्यावर ही घोषणा केली आहे.

कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर (सीपीओ) राम सुंदरराजन यांनी बैठकीमध्ये व्हेरिएबल पेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना या तिमाहीत 85 टक्के कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याचे घोषित केले. अर्थात हा लाभ देताना त्यांनी पॉलिसीमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही सूचित केले. “व्हेरिएबल पे हा केवळ 5 टक्केच असतो. व्हेरिएबल पेबाबतच्या पॉलिसीमध्ये सध्या तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही,” असं सुंदरराजन म्हणाले.

गेल्या आठवड्यापर्यंत कंपनीचा कॉर्पोरेट वार्षिक नफा 10.80 टक्के वाढून 3983 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षीच्या मार्चच्या तिमाहीत हा नफा 3593 कोटी रुपये होता. कंपनीच्या या तिमाहीच्या सेल्समध्ये 17.70 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली. गेल्या वर्षीच्या 22,597 कोटी रुपयांच्या तुलनेत या वर्षी 26,060 कोटी रुपये कंपनीला मिळाले. कंपनीला झालेल्या नफ्यामुळे यंदाही कंपनीने व्हेरिएबल पेचं धोरण बदललेलं नाही. तसेच फ्रेशर्सना संधी देण्याची भूमिकाही कंपनीने कायम ठेवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post