Post Office Recruitment
भारतीय टपाल खात्यातील भरतीसाठी अनेकजण इच्छूक असतात. भारतीय टपाल खाते देखील सातत्याने कोणत्याना कोणत्या पदांसाठी भरती करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वीच देशभरात जवळपास लाखभर पदे भरल्यानंतर आताही देशातील वेगवेगळ्या ठिकाणांसाठी भरती सुरूच आहे. टपाल खात्याने सध्या मुंबई विभागात भरतीसाठी (Post Office Recruitment Mumbai) घोषणा केली आहे.
भारतीय टपाल खात्याने नुकत्याच जारी केलेल्या अधिकृत नोटिफिकेशन नुसार मुंबईसाठी काही रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 13 मे 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही पदभरती ‘कुशल कारागिर’ या पदासाठी असून ‘मेल मोटार सर्विस, मुंबई’ अंतर्गत भरती केली जाणार आहे.
भारतीय टपाल खात्याने जाहीर केलेल्या या पदभरती अंतर्गत 10 रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदभरतीसाठी 18 ते 30 वर्षे वयाची अट आहे. यामध्ये SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सवलत तर OBC उमेदवारांना 3 वर्षे सवलत आहे. या पदभरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या पे स्केलनुसार Rs. 19,900/- (Level-2 In The Pay Matrixas Per 7th CPC) वेतन मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
सरकार द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र किंवा इयत्ता 8 वी परीक्षा उत्तीर्ण, तसेच 01 वर्षे अनुभव. तर मोटार वाहन मेकॅनिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जड मोटार वाहने चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्सआवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी खाली दिलेली मुळ PDF/जाहिरात पाहावी.)
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वर, मुंबई 400018
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मे 2023
PDF जाहिरात – https://Bit.ly/3ZS9Vtz
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
मेल मोटर सेवा भरती 2023 साठी निवड प्रक्रिया
- कुशल कारागिरांची निवड आवश्यक असलेल्या उमेदवारांमधून केली जाईल
- पात्रता आणि वैध ड्रायव्हिंग परवाना [केवळ मेकॅनिकसाठी (MV)] स्पर्धात्मक व्यापार चाचणीद्वारे.
- पात्र उमेदवारांना त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि ठिकाण स्वतंत्रपणे सूचित केले जाईल.
- पात्र नसलेल्या इतर अर्जदारांच्या संदर्भात कोणतीही सूचना पाठवली जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.
मेल मोटर सेवा भरती 2023 अर्ज कसा करायचा?
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज फक्त स्पीड पोस्ट/नोंदणीकृत पोस्टद्वारे पाठवावा