7 वी ते पदवीधारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि ठाणे या महानगरपालिकेमध्ये मेगा भरती सुरू होणार आहे.
तब्बल ३१ हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी या पाच महानगरपालिकेमध्ये भरती होणार आहे. या भरतीसाठी काही महानगरपालिकांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.
तर येत्या महिनाभरात काही महानगरपालिकांच्या जाहिराती निघण्याची दाट शक्यता आहे.
बेरोजगार तरुणांसाठी ही संधी सुवर्णसंधी ठरणार आहे. या भरतीच्या माध्यमातून दहावी ते पदवीधर उमेदवारांना रोजगार मिळणार आहे. २० हजार ते ५० हजारांपर्यंत वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिला जाणार आहे.
एप्रिल, मे महिन्यापर्यंत सर्व भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र सरकारने काही भरतींना स्थगिती दिली असताना, तरुणांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रोजगाराची आशा जागृत झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिका मूळ जाहिरात, पोस्ट तपशील, वेतन, अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ठाणे महानगरपालिकेची मूळ जाहिरात, पोस्ट तपशील, वेतन, अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नाशिक महानगरपालिकेची मूळ जाहिरात, पोस्ट तपशील, वेतन, अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पुणे महानगरपालिकेची मूळ जाहिरात, पोस्ट तपशील, वेतन,अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
चालू असलेल्या भरत्या;
बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका या महानगरपालिकेच्या सध्या भरत्या सुरु आशेत. तसेच याची जाहिरात देखील त्यांनी प्रसिद्ध केली आहे.
येत्या दोन-तीन महिन्यांत ठाणे महापालिकेमध्ये तब्बल 8688 कामगारांची भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महानगरपालिकेमध्ये यासाठी निविदा सुद्धा काढली आहे.
नाशिक महापालिकेत सुमारे २८०० पदांसाठी नवीन भरती होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजलं आहे.