Talathi Bharti 2023

राज्यात ४ हजार १२२ तलाठ्यांची भरती | महत्वाची अपडेट.😎





तलाठी भरती कडे नजर लावून बसलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तलाठी भरतीचा (Talathi Bharti 2023) मार्ग आता मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील (पेस) जागांवरून असलेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेत लेखी आदेशही जाहीर केला आहे. यात अनुसूचित क्षेत्रात (पेसा) अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गालाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली असून पुढील महिनाभरात राज्यातील रिक्त असलेली ४ हजार १२२ तलाठी पदे भरली जातील. 

पेसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यापालांचा यापूर्वीचा आदेश होता. त्यानुसार राज्यातील तब्बल ११ जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती.

अनेक जिल्ह्यांत आदिवासींसह इतरही प्रवर्गांची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. त्याविरोधात तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले. त्याचीच दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर २०१९ साली राज्यपालांनी त्याबाबत अध्यादेशही दिले होते. यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली. परंतु, त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती. त्यामुळे तलाठी भरतीची (Talathi Bharti 2023) डिसेंबरपूर्वीच घोषणा होऊन अन् एप्रिलपर्यंत भरती पूर्ण करण्याची घोषणाही तांत्रिक कारणामुळे फक्त घोषणाच ठरली होती.

२०२३ मध्ये प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यात बिंदू नामावलीसह इतरही काही दुरुस्त्या आहेत का? बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती.

त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करूनही ती तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते. ही रखडून पडलेली भरती आता नुकताच शासन निर्णय जाहीर झाल्याने लवकरच जात प्रवर्गानुसार तलाठी पदांची फेर संख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याचे सूतोवाच शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठीसह १७ संवर्गांच्या भरतीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

आदिवासी लोकसंख्येनुसार अशी होणार पदभरती

∆ ५० टक्क्यापेक्षा अधिक : एस.टी. प्रवर्गातूनच १०० टक्के तलाठी पदे भरणार.

∆२५ ते ५० टक्क्या दरम्यान आदिवासी लोकसंख्येसाठी : ५० टक्के पदांची संधी.

∆२५ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असल्यास : २५ टक्के पदे भरणार जागा वाढणार प्रमाणानुसार ही पदे भरली जातील. एस. टी. प्रवर्गाची लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांत सर्वसाधारणसह एस.सी, ओबीसी व इतर घटकांच्या जागा वाढतील.

समांतर पातळीवर पदभरतीकरिता परीक्षेसाठी टीसीएस कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांच्याबरोबर सामंजस्य करार करून पुढील कार्यवाही केली जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post