१५ ऑगस्टपूर्वी जिल्हा परिषदांमध्ये ७५,००० जागांची भरती

 ZP Mega Bharti |2023-24| 



स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकार (ZP Mega Recruitment) सरळसेवा कोट्यातील ७५ हजार पदांची भरती करणार आहे. १५ ऑगस्टपूर्वी ही पदे भरली जाणार असून सर्व जिल्हा परिषदांमधील ‘गट-क’ संवर्गातील १८ हजार ९३९ पदे एकावेळी भरली जाणार आहेत. त्यासाठी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाड्याने घेतली जाणार आहे. आयबीपीएस व टीसीएस या खासगी कंपन्यांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.

१० एप्रिल रोजी राज्यातील बेरोजगारीवर प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर १२ एप्रिलला ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत. १६ मार्च २०२३च्या शासन निर्णयानुसार, ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये सरळसेवेच्या भरतीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल केली आहे. (ZP Mega Recruitment)

तसेच मार्च २०१९च्या जाहिरातीप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेले सर्व उमेदवार देखील परीक्षा देऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, ‘आयबीपीएस’कडून उमेदवारांसाठी ‘ॲप्लिकेशन पोर्टल’ विकसित केले जात आहे. त्यासंबंधाने पुढील काही दिवसांत सर्व जिल्हा (ZP Mega Recruitment) परिषदांना त्यांच्या पद भरतीसंदर्भातील जाहिरातीचा नमुना, आरक्षणनिहाय रिक्त पदे, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, याची माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post