८ वी पास उमेदवारांना मेल मोटर सर्व्हिस मुंबई अंतर्गत कामाची सुवर्णसंधी.
मेल मोटर सर्व्हिस मुंबई अंतर्गत भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरतीअंतर्गत एकूण १० रिक्त पदांची जागा भरली जाणार आहे.
त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
ऑफलाईन अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख हि 13 मे 2023 आहे, तसेच भरतीचा अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे, भरती होण्यासाठ पात्रता काय आहे? याबद्दल जाणून घेण्यासाठी माहिती शेवटपर्यंत वाचा.
पद संख्या - १०
पदाचे नाव : कुशल कारागीर
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र किंवा इयत्ता 8 वी परीक्षा उत्तीर्ण व किमान १ वर्षाचा कामाचा अनुभव आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
वयाची अट :
18 ते 30 वर्षे व SC/ST – 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी :फी नाही
पगार : 19,900/- रुपये महिना
निवड पद्धत:
इच्छुक व पात्र उमेदवारांची स्पर्धात्मक चाचणीद्वारे कुशल कारागिरांची निवड केली जाईल. पात्र उमेदवारांना त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि ठिकाण याबद्दल स्वत्रंत पत्राद्वारे माहिती देण्यात येईल