अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ट ग्रामपंचायत व गावांची सुधारीत यादी

राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने व भूजलाची गुणवत्ता व उपलब्धता सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत “अटल भूजल (अटल जल) योजना” राज्यात ठराविक १३ जिल्ह्यांमधील ३८ तालुक्यातील ७३ पाणलोट क्षेत्रातील १३३९ ग्रामपंचयातींमधील १४४३ गावांमध्ये राबविण्याबाबतच्या सूचना दिनांक २४/१०/२०२० रोजीच्या शास निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत.

खालील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-२ मध्ये सदरील पाणलोट क्षेत्रातील गावांची यादी नमूद केली आहे. सदरील यादीतील गावांच्या प्रशासकीय सद्यस्थितीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत, तालुका, नागरी भागात समावेश, अस्तित्वात नसलेली गावे इ. स्थितीत काही कारणास्तव बदल संभवत असून काही गावे वगळून सुधारीत यादी प्रसिध्द करणे आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने शुध्दीपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय दिनांक २६/११/२०२० खालील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट – २ मध्ये उचित सुधारणा करून परिशिष्ट-२ या शुध्दीपत्रकासोबत जोडले आहे.

दिनांक २६/११/२०२० रोजीच्या शासन निर्णयात समाविष्ट पाणलोट क्षेत्रे कायम असून गावे, ग्रामपंचायत व तालुक्यांच्या संख्येत बदल होत असून सदरील योजना सद्यस्थितीत राज्यातील १३ जिल्ह्यांतील ४३ तालुक्यातील ७३ पाणलोट क्षेत्रातील ११३३ ग्रामपंचायतीमधील १४४२ गावात राबविण्यात येत आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय आणि अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ट ग्रामपंचायत व गावांची सुधारीत यादी:

केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल (अटल जल) योजना राज्यात राबविणेबाबत शासन निर्णय आणि अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ट ग्रामपंचायत व गावांची सुधारीत यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंटमध्ये विचारू शकता.. सहकार्याबद्दल धन्यवाद 🤝


What's up group link 🔗

https://chat.whatsapp.com/G5nRuuFaDf309qQrtD0HDw

Post a Comment

Previous Post Next Post