राज्यातील हजारो तरुण तारुंनी जिल्हा परिषद भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु आता प्रतीक्षा संपली आहे, कारण नुकताच जिल्हा परिषद भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेची भरती 01 मे ते 07 मे दरम्यान होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच या भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार महिने लागणार असून, फेब्रुवारी पासून प्रत्यक्षत असलेली भरतीची जाहिरात मे महिन्यामध्ये सुरु होणार आहे, तसेच या संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी किमान ३ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता आहे.
या प्रक्रियेमध्ये इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवाराचे अर्ज पडताळणे, भरतीसाठी पात्र असलेले उमेदवार निवडणे, तसेच या उमेदवारांना परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध करून देणे.
त्यानंतर परीक्षा आणि त्यानंतर निकाल जाहीर करून पास झालेल्या उमेदवाराना नियुक्त करणे अश्या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश असणार आहे.
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील 2538 रिक्त जागाच्या 80 टक्के म्हणजे 2030 जागा भरण्यासाठी सुरुवात झाली आहे,
तसेच ग्राम विकास विभागाने प्रकाशित केलेल्या केलेल्या वेळापत्रकानुसार 01 ते 07 मे दरम्यान भरतीची जाहिरात उपलब्ध होणार आहे.
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये गट क आणि गट ड अश्या तब्बल 2726 जागा रिक्त आहेत आणि यामधील 2538 जागा या गट क मधील आहेत तर 188 जागा गट ड मधील आहेत.
परंतु गट क मधील ८०% जागा भरण्यासाठी ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदांना सूचना दिली आहे.
वेळापत्रक पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
🔎 https://drive.google.com/file/d/1AFDwEImZuIluLhjyoGNpwbqxjkI0HY_W/view?usp=drivesdk