अनेक वेळा पॅनकार्ड आधारशी लिंक केल्यानंतरही ते लिंक होत नाही आणि त्याची कल्पनाही अनेकांना नसते. त्यामुळे पॅनकार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता असते. त्यामुळे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक झाले आहे की नाही हे तपासून घेणं गरजेचं ठरत.
पॅन आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे असं तपासा
1) सर्वप्रथम आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
2) यानंतर तुम्हाला Know Your Pan या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3)यानंतर त्यात विचारलेली तुमची सर्व माहिती भरून सबमिट बटणवर क्लिक करा.
4) त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल, तो यामध्ये नमूद करा.
5)यानंतर तुमचा पॅन क्रमांक, नाव आदी माहिती समोर येईल.
या माहितीत तुमचे पॅन कार्ड सक्रिय आहे की नाही ते तपासता येईल.