१०वी ते पदवीधर उमेदवारांना महिला व बाल विकास विभाग अंतर्गत नोकरी

Mahila BalVikas Vibhag Nashik Bharti 2023 |

WBVN Recruitment 

प्रिय मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग भरती 2023 (Maharashtra WCD Bharti 2023) ची वाट पाहत आहात का?

तर मग ही संधी चूकवु नका.महिला व बाल विकास विभाग अंतर्गत (Mahila Bal Vikas Vibhag Nashik Bharti) रिक्त जागांची भरती केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत.

महिला व बाल विकास विभागच्या पदभरती (Mahila Bal Vikas Vibhag Nashik Bharti ) अंतर्गत नाशिक, मनमाड, मालेगाव येथे “शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक, मदतनीस तथा पहारेकरी, स्वच्छता कर्मचारी, समुपदेशक, स्वयंपाकी, काळजी वाहक” पदांच्या एकूण १४ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ मे २०२३ आहे.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्षे या दरम्यान असावे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक ४२२०११ या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

PDF जाहिरात – https://workmore.in/Pdf

अधिकृत जाहिरात – nashik.gov.in

पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक -  B.PED degree

मदतनीस तथा पहारेकरी - 10th pass

स्वच्छता कर्मचारी - 10th pass

समुपदेशक -  Graduate in Social Work/ Sociology/ Psychology/ Public health/Counselling from a recognized university

स्वयंपाकी - 10th pass

काळजी वाहक - 10th pass

अर्ज ऑफलाईन पध्दतीने करावेत. तसेच दिलेल्या पत्यावर विहित तारखेआधी पोहचतील याची काळजी घ्यावी. उशिरा आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जा सोबत आवश्यक त्या कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज स्विकृत झालेल्या पात्र उमेदवारास मुलाखतीस बोलविण्यात येईल. अर्ज स्विकृत करण्याचे, पदांच्या संख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार निवड समितीस राहतील. सदरची पदे ११ महिन्यांकरीता कंत्राटी तत्वावर भरण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post