10 वी, 12 वी, पदवीधर उमेदवारांना संधी पुणे रोजगार मेळावा
Pune Jobक्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचार प्रबोधन वर्ष २०२३ च्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बानाई संस्था पुणे यांच्या वतीने शुक्रवारी (ता.२१) सकाळी दहा वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी पिंपरी येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार (Pune Jobs 2023) मेळाव्याचे आयोजन केले आहे.
औद्योगिक क्षेत्रामधील खाजगी उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्याकडून सुमारे दोन हजारपेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहेत.” अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी दिली.
पुणे व पिंपरी चिंचवड भागात गरजूंना रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यासाठी किमान इयत्ता १० वी, १२ वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविकाधारक, अभियांत्रिकी पदवी, एमबीए, बीसीए उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी HTTPS://WWW.ROJGAR.MAHASWAYAM.GOV.IN या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा,.” असे आवाहन मोहिते यांनी केले आहे