Computer Science & Cyber Security यामध्ये आहेत करिअरच्या अगणित संधी.


सध्याचे युग हे डिजिटलायझेशनचे युग आहे. डिजिटलायझेशनची प्रणाली सुरळीत चालावी यासाठी बॅकएंडला अनेक तंत्रज्ञांची गरज भासते. जेव्हा मार्केटमध्ये विशिष्ट तंत्रज्ञानाची गरज असते तेव्हा कंपन्या अनेक नवीन कर्मचारी नियुक्त करतात. आजघडीला सायबर सिक्युरिटी आणि कॉम्प्युटर सायन्स यामुळेच वेगाने वाढणारे करिअर (Computer Science & Cyber Security Career) आहे.

वाढत्या करिअरच्या संधीमुळे या दोन शाखांमधील ऑनलाइन तसेच ऑफलाइन अभ्यासक्रमांना जास्त मागणी वाढली आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्येही सायबर सिक्युरिटी आणि कॉम्प्युटर सायन्स (Computer Science & Cyber Security Career) या दोन शाखांमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यासक्रम ऑफर केले जात आहेत. जर तुम्हालाही यामध्ये करिअर करायचे असेल तर तुम्हीही प्रवेशासाठी या कोर्सेसबद्दल माहिती घेऊ शकता.

यामध्ये खालील अभ्यासक्रमांचा समावेश होतो.. (Computer Science & Cyber Security Career)

1) कॉम्प्युटर सायन्स फॉर लॉयर्स :

वकिलांसाठी असलेला हा कोर्स तुम्हाला क्लायंटचे तांत्रिक निर्णय आणि धोरणांच्या कायदेशीर परिणामांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे माहिती देईल. हा ऑनलाइन कोर्स व्हिडिओ मॉड्युल्सच्या सीरिजप्रमाणे शिकवला जातो. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या वेळापत्रकानुसार प्रवेश घेऊ शकता. प्रोग्रॅमिंग लँग्वेज, अल्गोरिदम, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटाबेस डिझाइन आणि कायदा व तंत्रज्ञानामधील आव्हानं यांसारख्या विषयांचा या कोर्समध्ये समावेश होतो. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी प्रोग्रॅमिंगचा पूर्व अनुभव आवश्यक नाही. सहभागी व्यक्ती कॉम्प्युटर सायन्समधील विविध संकल्पना आणि भाषांशी संबंधित मूलभूत समज विकसित करतील.

2) CS50 : कॉम्प्युटर सायन्सची ओळख :

CS50x हा हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा, कॉम्प्युटर सायन्स आणि प्रोग्रॅमिंगमधील इंटलेक्च्युअल लेव्हलचा हा कोर्स आहे. अनुभवी किंवा अन-अनुभवी व्यक्तींना तो उपयुक्त ठरणार आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना अल्गोरिदमिक पद्धतीनं विचार करण्यास आणि कार्यक्षमतेनं समस्यांचं निराकरण करण्यास शिकवतो. या कोर्समधील विषयांमध्ये अ‍ॅब्स्ट्रॅक्शन, अल्गोरिदम, डेटा स्ट्रक्चर्स, एन्कॅप्स्युलेशन, रिसोर्स मॅनेजमेंट, सिक्युरिटी, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग आणि वेब डेव्हलपमेंट यांचा समावेश होतो. या शिवाय, सी, पायथॉन, एसक्युएल, जावा स्क्रिप्ट, सीएसएस आणि एचटीएमएल यांचाही समावेश होतो.

या कोर्ससाठी पात्रता :

जे विद्यार्थी 9 प्रॉब्लेम सेट्स (प्रोग्रॅमिंग असाइनमेंट) आणि फायनल प्रोजेक्टमध्ये समाधानकारक गुण मिळवतात ते या कोर्सचं प्रमाणपत्र मिळवण्यास पात्र असतात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या वेळापत्रकानुसार CS50x मध्ये प्रवेश घेऊ शकता.

या कोर्समधून तुम्ही काय शिकाल?

  • कॉम्प्युटर सायन्स आणि प्रोग्रॅमिंगची व्यापक आणि सखोल समज.
  • अल्गोरिदमिक पद्धतीने विचार कसा करावा आणि प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम्स कार्यक्षमतेनं कसे सोडवावेत.
  • अॅब्स्ट्रॅक्शन, अल्गोरिदम, डेटा स्ट्रक्चर्स, एन्कॅप्सुलेशन, रिसोर्स मॅनेजमेंट, सिक्युरिटी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि वेब डेव्हलपमेंट यासारख्या संकल्पना.
  • सी, पायथॉन, एसक्युएल, जावा स्क्रिप्ट, सीएसएस आणि एचटीएमल या भाषांची ओळख.
  • अनुभवाच्या सर्व स्तरांतील समविचारी उत्साही समुदायाशी कसा संवाद साधावा.
  • आपल्या समवयस्कांना फायनल प्रोग्रॅमिंग प्रोजेक्ट कसा विकसित करावा आणि सादर करावा.

3) सायबर सिक्युरिटी :

A) हार्वर्ड व्हीपीएएल सायबर सिक्युरिटी :

माहितीच्या युगात जोखीम व्यवस्थापनासाठी हा ऑनलाईन शॉर्ट कोर्स आहे. संस्थेच्या नेटवर्क्स, सिस्टम्स आणि डेटामधील धोकादायक प्रवेश कसे ओळखावेत आणि ते कसे कमी करावेत याबद्दल सर्वसमावेशक माहिती या कोर्सच्या माध्यमातून मिळते. एखाद्या संस्थेच्या रिस्क प्रोफाइलचं क्रिटिकल विश्लेषण कसे करावे आणि सायबर सिक्युरिटी लँडस्केपच्या गुंतागुंतीतून आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आवश्यक कौशल्यं कशी मिळवावीत हे या कोर्समधून शिकायला मिळते.

या कोर्समधून तुम्ही आणखी काय शिकाल?

  • सिक्युरिटी ब्रीच ओळखणं आणि त्याची माहिती प्रसारित करणं.
  • सायबर हल्ल्याला प्रतिसाद देण्यासाठी आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी योग्य धोरणांची शिफारस करणं.
  • संस्थेच्या क्रिटिकल बिझनेस सिस्टिम्स, नेटवर्क आणि डेटाच्या सुरक्षा क्षमतेचं मूल्यांकन करणं.
  • सायबर लॉच्या आकलनाद्वारे तुमची संस्था व्यवसाय क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या आवश्यकतांचं पालन करत असल्याची खात्री करणं.
  • संस्थेसाठी जोखीम कमी करण्याच्या धोरणाची रचना आणि अंमलबजावणी करणं.

B) इंटरसेक्शन ऑफ पॉलिसी अँड टेक्नॉलॉजी :

हा हार्वर्ड विद्याशाखेतील सदस्य, धोरणकर्ते आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील अग्रगण्य प्रॅक्टिशनर्सच्या टीमच्या नेतृत्वाखाली एक आठवडाभर चालणारा कार्यक्रम आहे. यातील तज्ज्ञांपैकी बरेच जण जगभरातील सरकार, एजन्सी आणि उद्योगांना सल्ला देणारे आहेत.

या कोर्समधून तुम्ही काय शिकाल?

  • घडलेल्या घटनांबाबत घेतलेली लेक्चर्स आणि केस स्टडीच्या माध्यमातून सायबर सिक्युरिटी आणि तंत्रज्ञानामध्ये असलेल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करता येईल.
  • वर्किंग ग्रुप सेशन्समुळे तुम्ही जगभरातील समवयस्कांशी समस्यांबाबत चर्चा करू माहिती मिळवू शकाल. समस्या सोडवण्यासाठी तुमच्या स्वतःच्या देशात किंवा संस्थेमध्ये सायबर सिक्युरिटी इनसाईट्स कसे लागू करता येतील यावर चर्चा करून शिकाल.

Post a Comment

Previous Post Next Post