Aasha Recruitment
Aasha Recruitmentपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकाची भरती (PCMC Recruitment) प्रक्रिया सुरू झाली आहे. सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्टची तब्बल १५४ पदे भरावयाची आहेत. (Aasha Recruitment)
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता केवळ दहावी उत्तीर्ण अशी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया विविध रुग्णालयात २५ एप्रिल २०२३ ते ४ मे २०२३ या दरम्यान आयोजित केली आहे. (Aasha Recruitment)
या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीव्दारे केली जाईल. संबंधित लोकसंख्येमध्ये यापुर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर आशा स्वयंसेविका म्हणुन काम करण्यास इच्छुक असल्यास लिंक वर्करची आशा स्वयंसेविका म्हणुन निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल.
महापालिकेच्या आकुर्डी, यमुनानगर, भोसरी, नेहरूनगर, सांगवी, तालेरा, जिजामाता, नवीन थेरगाव, आदी विविध रुग्णालयात २५ एप्रिल २०२३ ते ४ मे २०२३ पर्यंत सकाळी ०९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालयनिहाय अर्ज स्वीकृतीची मुदत वेगवेगळी आहे. अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
आवश्यक कागदपत्रे
- इच्छुक व पात्र उमेदवारांनी म.न.पा.संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्रे व खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात. (अर्जासोबत मुळ कागदपत्रे जोडून नयेत)
- पासपोर्ट साईज फोटो
- जन्म तारखेचा पुरावा (जन्माचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला)
- रहिवाशी दाखला, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड, लाईट बिल, कार्यक्षेत्रातील स्थायिक रहीवासी असलेबाबतचा पुरावा
- पॅन कार्ड
- लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
- नावात बदल असल्यास गॅझेट (राजपञ)
- अनुभव प्रमाणपत्र
- विधवा असल्यास (पतीचा मृत्युचा दाखला) / परितक्त्या असल्यास (घटस्पोटाचे कागदपत्रे) त्याबाबतच्या कागदपत्रांची छायांकित सत्यप्रत