Axix Bank
- Axis बॅंकेत नोकरीची संधी; मिळेल लाखो रूपयांचे पॅकेज | Axis Bank Young Bankers Program.
India - देशातील अग्रगण्य असणार्या मोठ्या बँकेत career करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मोठया पगाराची आपेक्षा आसणाऱ्यासाठी ही संधी खूप महत्त्वाची असणार आहे.Axix Bank एका विशेष प्रोग्राम द्व्यारे पदवीधरांना थेट बॅंकेतील नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. आतापर्यंत या द्वारे 10000 तरुण - तरुणींना नोकरीत सामावून घेतले आहे.
मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेसच्या भागीदारीत Axix बँकेने यंग बँकर्स प्रोग्रामची सह-निर्मिती केली आहे. हा Program यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, सहभागी उमेदवाराला मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE) कडून बँकिंग सेवांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रदान केला जातो.
हा Program पदवीधर तरुणांना बँकिंग क्षेत्रातील career करण्यासाठी तयार केला आसून या द्वारे त्यांना रिटेल बँकिंग, शाखा बँकिंग, क्रेडिट आणि ऑपरेशन्ससह अनेक प्रकारची माहिती दिली जाते.
या program साठी निवड झालेल्या तरुणांना खालील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
1) मणिपाल अकादमी बेंगळूर येथे सहा महिने वर्गात शिक्षण घ्यावे लागते.
2) बँकेच्या कोणत्याही शाखा/कार्यालयात अॅक्सिस बँकेसोबत 3 महिन्यांची इंटर्नशिप.
3) Axix बँकेसोबत 3 महिन्यांचे ऑन-द-जॉब प्रशिक्षण घ्यावे लागते.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट यंग बँकर फर्स्ट डे फर्स्ट अवर नोकरीसाठी तयार करणे हा आहे.
पात्रता - Axix Bank Young Banker Program
1) कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर यासाठी पात्र असून पदवीच्या अंतिम वर्षात 50% आणि त्याहून अधिक किंवा पदवीच्या सर्व वर्षांमध्ये एकूण 50% आणि त्याहून अधिक गुण.
2) पदवी/पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवार जे त्यांच्या परीक्षेला बसले आहेत आणि निकालाची वाट पाहत आहेत ते देखील कार्यक्रमासाठी पात्र आहेत.
3) पदवी (10+2+3 नमुने) अनिवार्य आहे.
या प्रक्रियेचे तीन टप्पे आहेत ते खालील प्रमाणे -
पहिला टप्पा
1) Axix Bank च्या website वर जाऊन online अर्ज भरून स्वतःची नोंदणी करायची आहे.
2) अर्जाचे असलेले शुल्क भराचे आहे.
दुसरा टप्पा
1. लेखी चाचणी
2. व्हिडिओ मुलाखत
तिसरा टप्पा
निवडलेल्या उमेदवारांना प्रवेश पत्र दिले जाईल. प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांची कॅम्पसमध्ये नोंदणी केली जाईल.
ज्यांना या मध्ये सहभागी होऊन एक मोठ्या बँकेत नोकरी करायची आहे त्यांनी खालील दिलेल्या लिंक वर click करून स्वतः ची नोंदणी करायची आहे.